महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.
वह्यांच्या कोर्‍या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा सर्वेक्षण अहवाल
शालेय वर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च, २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही पृष्ठे “माझी नोंद” या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. एकात्मिक पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पृष्ठांच्या यशस्वितेसंदर्भात शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून २०/१०/२०२३ ते ०३/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन स्वरुपात प्रश्नावली भरून घेण्यात आली. प्रश्नावलीच्या माध्यमातून शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून अभिप्राय प्राप्त झाले. अभिप्रायांच्या आधारे सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले. सांख्यिकीय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
प्राप्त प्रतिसादांचे सांख्यिकीय विश्लेषण
Enter Mobile No.
Select who you are