शिक्षकांसाठी ‘एकांकिका पाठवा’ निवेदन
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळात इयत्ता सातवी व नववीच्या नवीन पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम चालू आहे. या स्तरावर अध्यापन करणारे शिक्षक वेगवेगळ्या प्रसंगाने एकांकिका लेखन करत असतात. मराठी/इंग्रजी/हिंदी भाषेतील सदर एकांकिका मंडळाच्या मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा समित्यांच्या अवलोकनार्थ इ-मेलद्वारा मागवण्यात येत आहेत. या एकांकिकांपैकी समितीला योग्य वाटणार्या एकांकिकेची योग्य त्या स्तरावरील पाठ्यपुस्तकात निवड करण्यात येईल. त्यासाठी सध्या कार्यरत असणार्या शिक्षकांनी या स्तरावरील वयोगटाला अनुरूप असे विषय व लांबी असणार्या एकांकिका पाठवाव्यात.
-
एकांकिका निवडीबाबत समितीचा निर्णय अंतिम राहील आणि न निवडलेल्या साहित्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
-
इच्छुक शिक्षकांनी स्वत: लिहिलेली एकांकिका दि. २७ जानेवारी २०१७ पर्यंत पुढे नमूद केलेल्या इ-मेलवर PDF Format (पीडीएफ फॉरमॅट) मधे पाठवावी. एकांकिकेची छापील/हस्तलिखित पाने स्कॅन करून पाठवल्यास त्या पानांची एक PDF file करून पाठवावी.
-
एका शिक्षकाने तीनपेक्षा अधिक एकांकिका पाठवू नयेत.
-
मुदतीनंतर आलेल्या एकांकिकांचा या उपक्रमात विचार केला जाणार नाही.
-
सोबतच्या नमुन्यानुसार प्रमाणपत्र पूर्ण भरून न पाठवल्यास एकांकिकेचा विचार केला जाणार नाही. नमुन्यासाठी इथे क्लिक करा
एकांकिका balbharati.ekankika@gmail.com या इ-मेलवर पाठवाव्यात.